
पांढरा समुद्र येथे बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला भाटीमिऱ्यात
रत्नागिरी : समुद्राच्या पाण्यात जाऊन मौजमजा करत असताना अमिर मोहम्मद खान हा पाण्यात बेपत्ता झाला होता. शहरातील मुरुगवाडा येथील पांढरा समुद्रात सोमवारी सायंकाळी 4 वा. ही घटना घडली होती. या बेपत्ता तरुणाचा मृतदेह तिसर्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी भाटीमिर्या येथे आढळून आला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमिर मोहम्मद खान (22, मूळ रा. बिहार सध्या रा. फिनोलेक्स कॉलनी, शेजारी रत्नागिरी) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी अमिर खान त्याचा मित्र अर्जुन राजेंद्र रामकुमार (19, मूळ रा. बिहार सध्या रा. फिनोलेक्स कॉलनी शेजारी, रत्नागिरी) आणि अमनराम हे तिघे सुट्टी असल्याने सायंकाळी 4 वाजता पांढरा समुद्र येथे फिरण्यासाठी गेले होते. मौजमजा करत असताना यातील अमिर पाण्यात बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह सापडला आहे.