
गॅस टर्मिनल हद्दपार करण्यासाठी नांदिवडे ग्रामस्थांचे श्री देव चव्हाट्याला गार्हाणे.
जिंदल कंपनीचा गॅस टर्मिनल प्रकल्प गावातून हद्दपार व्हावा म्हणून नांदिवडे ग्रामस्थांनी एकत्र येवून श्री देव चव्हाट्याला गॅस टर्निनलसारखे महाभयंकर संकट गावातून हद्दपार होवूदे. गावाचे रक्षण कर. प्रकल्प गावातून स्थलांतर करण्याची बुद्धी अधिकारी व प्रशासनाला दे, असे गार्हाणे घातले.काही महिन्यापूर्वी जिंदल कंपनीच्या गॅस प्रकल्पातून झालेल्या वायूगळतीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता.
यानंतर स्थानिक ग्रामस्थांकडून हा गॅस प्रकल्प येथून अन्यत्र हलवावा, अशी मागणी होत आहे. या संबंधीचे निवेदनही ग्रामस्थांकडून अधिकार्यांनाा देण्यात आले. वायूगळतीप्रकरणी कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.www.konkantoday.com