
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे पुलाच्या कठड्याला कारची धडक
खेड तालुक्यातील व मुंबई-गोवा महामार्गावरील भरणा नाका जवळील जगबुडी नदीवरील पुलाच्या डिव्हायडरला कारची धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील कैलास चंद्रकांत जाधव (४४, रा. परेल भोईवाडा, मुंबई), शाहरूख फुरोज खान (२६, रा. गोवंडी, टाटा नगर, मुंबई) या दोघांना गंभीर दुखापत झाली असून जखमींना उपचारार्थ जवळच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात सोमवार दि. ६ मे रोजी पहाटेच्या वेळी २.३० वा. च्या सुमारास घडला. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.www.konkantoday.com




