रत्नागिरीत मोबाईल शॉपी फोडून 5 लाखांचा मुद्देमाल लांबवला; एकाला पोलिसांनी केली अटक

0
45

रत्नागिरी : मोबाईल शॉपीचे शटर उचकटून चोरट्याने 5 लाख 2 हजार 284 रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. शहरातील शंकेश्वर आर्केड- आठवडा बाजार येथे ही घटना घडली. या प्रकरणी संशयितासह अन्य एकावर गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे. नूरमहमद दिलमहमद खान (वय 22, राहणार मच्छीमार्केट-रत्नागिरी) व आलम वागळे अशी संशयिताची नावे आहेत. ही घटना शनिवारी 13 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अमोल चंद्रकांत डोंगरे (वय 41, रा. रत्नागिरी) यांचे शहरात आठवडा बाजार येथे एस. एस. कम्युनिकेशन मोबाईल शॉपीचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून 89 हजार 990 रुपयांच्या आयफोनसह मोबाईल अ‍ॅक्सेसरी व मोबाईल असा 5 लाख 2 हजार 284 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here