विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका; गुहागरमध्ये एसटी आगाराला निवेदन
गुहागर तालुक्यातील एसटी आगाराच्या एसटी फेर्यांच्या तुटवड्यामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणाचे नुकसान होत होते.
या बाबत गुहागर तालुक्यातून कौंढर काळसुरमधून आवाज उठत होता. ही बाब लक्षात येताच गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी आगार व्यवस्थापक यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि या संदर्भातील निवेदनही दिले.
कौंढर काळसूर विद्यार्थ्यांच्या या अडचणीबाबत आगार व्यवस्थापकांशी चर्चा करत लवकरात लवकर बस सेवा चालू करा व विद्यार्थ्यां विषयीची तळमळ गुहागर आगार व्यवस्थापक, स्थानकप्रमुख यांना लेखी निवेदन सादर करून मांडली.
यावेळी मनसे तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर, विक्रम जोयशी, किशोर बामणे, तेजस पोपळे, सागर शिरगावकर, विवेक शिर्के, प्रसाद विखारे, आणि कौंढर काळसुर गावचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.