चिपळूण नगरपालिका पाणीपट्टीत करणार वाढ.

ब वर्ग असलेल्या चिपळूण नगर परिषदेने यावर्षी आपला १६४ कोटी ४९ लाख १५ हजार अर्थसंकल्प तयार केला आहे. त्यात तोट्यात असलेली पाणी योजना काही अंशी रूळावर आणण्यासाठी पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अल्पभाड्यात असणार्‍या आपल्या मालमत्तांचा करही वाढवला जाणार आहे.

कार्यालयाची भव्य इमारत, ग्रॅव्हीटी पाणी योजना, वाशिष्ठी नदीला संरक्षण भिंती, गटारे, नाले यांचे रूंदीकरण करण्याचे ध्येय या अर्थसंकल्पात करण्याचे ध्येय या अर्थसंकल्पात बाळगले आहे. उत्पन्न वाढीसाठी मटण, भाजी मंडई खुली करण्यात येणार आहे.मुख्याधिकारी तथा प्रशासक विशाल भोसले यांनी अन्य अधिकारी, कर्मचार्‍यांच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प तयार केला असून तो मंजुरीसाठी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button