
गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने काजळी नदी ची पातळी वाढली
गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने काजळी नदी ची पातळी वाढली असून आज 9 वाजता सकाळी पुराचे पाणी चांदेराई बाजारपेठेत भरले.अनेक दुकानदार आपल्या दुकानातील समान हलवण्यात व्यस्त आहेत..
रत्नागिरी काजरघाटी मार्गे लांजा मार्ग पूर्ण बंद असून वाहतूक थांबली आहे..
विदयुत पुरवठा अद्याप तरी असल्याने थोडे समाधान आहे..
चांदेराई हरचेरी ग्रामस्थांना दरवर्षी पुराचा त्रास होतो तो शापच आहे का असे वाटतेय, तर या शापातून वा या समस्येतून कधी मुक्ती मिळेल या प्रतीक्षेत सर्व ग्रामस्थआहेत
www.konkantoday.com

