चाफेरी येथे कुत्रा आडवा आल्याने दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू; चालकावर गुन्हा

रत्नागिरी : बेदरकारपणे दुचाकी चालवल्याने अपघात झाला. यात मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुचाकी चालकाविरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 27 जुलै रोजी सायंकाळी 7 वा. चाफेरी गवळीवाडी दरम्यान घडली होती. सुलतान मुहम्मद डिंगणकर (वय 55,रा.जांभारी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. या अपघातात मेहराज यासिन डिंगणकर (वय 45, रा. जांभारी, रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला. 27 जुलै रोजी सुलतान हे ऍक्टिवा (एमएच-46-वाय-9969) वरून मेहराज डिंगणकरला सोबत घेऊन जयगड ते खंडाळा असा भरधाव जात होता. कुत्रा आडवा आल्याने सुलतानने गाडीचा ब्रेक लावला. अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात झाला होता. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कळेकर करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button