
ऑस्करची गोष्टला बेस्ट चिल्ड्रन शॉर्ट फिल्म पुरस्कार
येथील नमनातील कलाकारांना, बाल कलाकारांना घेवून रत्नागिरीतील उक्षी येथील अभिनेता ते लेखक, दिग्दर्शक अशा जबाबदार्या सांभाळणार्या सुधीर घाणेकरने नमनातील कलाकारांचा जीवन दर्शन घडवणारा ऑस्करची गोष्ट हा लघुपट निर्माण केला. या लघुपाटाला सत्यजित ऋत्विक ग्रीनल इंटरनॅशनल कोलकाता फेस्टीव्हलमध्ये बेस्ट चिल्ड्रन शॉर्ट फिल्म पुरस्कार मिळाला आहे.
नमनातील, लहान मुलांना कलाकार संधी देण्यात येवून कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये न शिकता अनुभव आणि मेहनतीने ऑस्करची गोष्ट हा मराठी लघुपट बनवण्यात आला आहे.
जो एका स्मार्टफोनवर चित्रित केला गेला आहे. अभिनेता सुधीर घाणेकर याने लेखक दिग्दर्शक म्हणून केलेला हा पहिला लघुपट आहे. उक्षीतील जगप्रसिद्ध कातळशिल्पांचे चित्रिकरण, सामान्य शेतकरी, कष्टकरी लोकांचे जीवन, कोकणातील रूढी परंपरा, निसर्गसौंदर्य, जैवविविधतेचे दर्शन घडविले आहे. दिव्यांग मुलांचे हक्क व त्यांच्याकडे समाजाचा दृष्टीकोन अधोरेखित करत अवयवदान, शिक्षणाचे महत्व सांगणारी गोष्ट आहे. www.konkantoday.com

