लोटे परिसरातील रासायनिक प्रकल्पात काम करणाऱ्या परराज्यातील कर्मचार्यांर्‍याच्या आरोग्याची दुरवस्था

0
24

केवळ पोट भरण्यासाठी परराज्यातून आलेल्या कामगारांना राबवून त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार लोटे रासायनिक प्रकल्पातील काही कंपन्यांकडून होत असल्याचे उघड झाले आहे
खेडमधील लोटे एमआयडीसीमध्ये धक्कादायक प्रकार मानवाधिकार संघटनेचे किरण तायडे व अन्य कार्यकर्त्यांनी कामगारांच्या निवासस्थानाला भेट दिली असता हा प्रकार उघड झाला आहे एमआयडीसीमधील रासायनिक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या परराज्यातल्या कामगारांच्या आरोग्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे परराज्यातून आलेले हे कामगार एका लहानशा खोलीत २५ ते ३०अशा संख्येने राहतात या कामगारांची शारीरिक तपासणी केली असता कामगारांचे डोळे, कान, नाक, एवढंच नाही तर त्यांची त्वचा आणि केस देखील अक्षरशः निळ्या रंगाने माखलेले पाहायला मिळाले.
हे सर्व कामगार लोटे एमआयडीसीमधील रासायनिक कंपन्यांमध्ये काम करतात. अनेक कामगारांना त्वचेचे विकार, डोळ्यांचे त्रास देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. १५ ऑगस्ट निमित्त मानवाधिकार संघटनेच्यावतीने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार होते. त्यासाठी एमआयडीसी परिसरात पाहणीसाठी गेलेल्या मानवाधिकार संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष किरण तायडे, अरबाज बडे प्रशांत गमरे,स्वराज गांधी, प्रवीण भोसले, या पदाधिकाऱ्यांना हे वास्तव निदर्शनास आलं. त्यानंतर एमआयडीसीमध्ये कामगारांना कशाप्रकारे वागवले जाते, त्यांच्या आरोग्याशी कशाप्रकारे खेळले जाते हे समोर आले आहे.केवळ रोजासाठी व पोटासाठी कामगार हे सहन करीत आहेत कामगारांच्या कल्याणासाठी अनेक नियम असून तशा यंत्रणाही आहेत प्रदुषण नियंत्रण मंडळ, आरोग्य आणि सुरक्षा विभाग नेमकं काय काम करतंय असा प्रश्न निर्माण झालाय.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here