फुरुस येथील गव्यारेड्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या जाधव यांच्या कुटुंबियांना वन विभागाकडून 15 लाख

0
39

चिपळूण : फुरुस येथील गव्यारेड्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या सतिश जाधव यांच्या कुटुंबियांना वन विभागाकडून 15 लाख रुपयांची मदत जिल्हाधिकारी बी. एन. पाटील व आ. शेखर निकम यांच्या उपस्थितीत नुकतीच सुपुर्द करण्यात आली.
फुरुस (ता. चिपळूण) येथील तरूण सतीश जाधव हे 18 जुलै रोजी नेहमीप्रमाणे जंगलात गुरे चरवण्यासाठी गेले होते. यावेळी गव्यारेड्याने जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी अक्षता जाधव, मुली आर्या व अदिती जाधव, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.
मृत सतीश जाधव यांच्या वारसांना शासनाच्यातर्फे तातडीने मदत मिळावी यासाठी आ. शेखर व वन विभागाचे अधिकारी यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. ही मदत जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, आ. निकम, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, सहायक वनरक्षक सचिन निलख, माजी सभापती पूजा निकम, वनपाल डी. आर. भोसले यांच्या उपस्थितीत कै. सतीश जाधव यांच्या कुटुंबियांकडे देण्यात आली. यामध्ये 5 लाख रुपयांचा धनादेश व 10 लाख रुपयांची एफडी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री कीर, निलख, फुरुसचे सरपंच शांताराम कदम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here