राजापूर दिवटेवाडीतून प्रौढ बेपत्ता

0
40

राजापूर : राजापूर शहरातील दिवटेवाडीतील विजय बाळकृष्ण गोंडाळ (53) हे दि. 16 जुलै 2022 पासुन बेपत्ता असून त्याबाबतची रितसर नोंद त्यांच्या पत्नीने राजापूर पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. या बाबत राजापूर पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार विजय गोंडाळ हे 16 जुलै 2022 ला जवाहर चौकात आले होते. मात्र, तेथून ते परत घरी परतले नव्हते . त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी इतरत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते न सापडल्याने अखेर विजय गोंडाळ यांची पत्नी सुषमा विजय गोंडाळ यांनी दि 30 जुलैला राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्या नुसार पोलीस शोध घेत आहेत बेपत्ता असलेले विजय गोंडाळ यांच्याबद्दल कुणाला काही माहिती मिळाल्यास किंवा ते कुठे आढळून आले असतील तर राजापूर पोलिस ठाण्यात 02353-222033 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पी. ए. वाघाटे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here