
रत्नागिरीत मारूती मंदिर येथून दुचाकी लांबवली
रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर या वर्दळीच्या ठिकाणाहून दुचाकी लांबवली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनोहर गोलावडे (45, रा. रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 28 जुलै रोजी रात्री 8 वा. सुमारास ते आपली ड्रीम युगा दुचाकी (एमएच-05-बीडब्ल्यू-7614) मारुती मंदिर येथे पार्क करून खरेदीसाठी फिरत होते. खरेदी झाल्यावर ते दुचाकी घेण्यासाठी गेले असता ती गायब होती. अधिक तपास पोलिस नाईक वैभव नार्वेकर करत आहेत.