
आता शिवसेनेशी चर्चा बंद, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे
माजी पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते रामदास कदम हे भाजपवर वारंवार टीका करत आहेत. शिवाय त्यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीशी बोलताना आई-वडिलांबाबत चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यांनी माफी मागावी तसेच आता शिवसेनेबरोबर चर्चा बंद, असे स्पष्ट मत भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.रामदास कदम हे भारतीय जनता पार्टीचा द्वेष करत आहेत. त्यांनी आई-वडिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा साठे यांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे निषेध केला. हिंमत असेल तर युती तोडल्याचे जाहीर करा, सध्या खालच्या पातळीवर राजकारण सुरू आहे. रामदास कदम जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत चर्चा करण्यात येणार नाही. वरिष्ठांनी जरी दापोली मतदार संघाचा तोच उमेदवार ठरवला तरी आम्ही त्याचा स्वीकार करणार नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.www.konkantoday.com