रत्नागिरी जिल्ह्यात आज आणखी ७ कोरोना बाधित रुग्णांची भर

आज मिरज येथून आलेल्या कोरोना संशयितांच्या अहवालांपैकी ७ अहवाल पॉझिटिव आले आहेत.तर ४५५ अहवाल निगेटिव आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये गुहागर तालुक्यात २,दापोली तालुक्यात २,रत्नागिरी तालुक्यात २ आणि संगमेश्वर तालुक्यात १ असा रुग्णांचा समावेश आहे.रत्नागिरी तालुक्यात सापडलेले रुग्ण १७ तारखेला मुंबईहून आले होते व त्यांना २० तारखेला अॅडमिट करण्यात आले होते.गुहागर तालुक्यात सापडलेले २ रुग्ण श्रृंगारतळी येथील असून यापूर्वी सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहेत.दापोली तालुक्यात सापडलेले २ रुग्ण हे देवके बुद्रूक येथील मुळेचे असून ते मुंबई विरार येथून १६ तारखेला आले व २० तारखेला त्यांना ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.संगमेश्वर तालुक्यात सापडलेला एकमेव रुग्ण हा परचुरी येथील असून त्याला साडवली येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३२ झाली आहे तर अॅक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९१ झाली आहे.उपचारानंतर घरी सोडलेल्यांची संख्या ३७ तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button