हर्णै बंदरातील मासेमारी थंडावली


हर्णै बंदरातील मासेमारी १ जूनपासून थांबली असून सध्या नौका शाकारणीला सुरूवात झालेली दिसत आहे. आंजर्ले आड, केळशी, दाभोळ आदी बंदरात या नौका शाकारणीसाठी नेण्यात आल्या आहेत. त्यामुळे मत्स्यहारींना आता ओल्याची चव सुक्यावर बागवावी लागणार आहे.
शासन आदेशानुसार पश्‍चिम किनारपट्टीवरील मासेमारी बंदी कालावदी सुरू झाला आहे. त्यानुसार हर्णै बंदरातील मासेमारी नौका किनार्‍यावर विसावल्या असल्याने हर्णै बंदरातील उलाढाल पूर्ण ठप्प झाली आहे. आता १ ऑगस्ट नंतरच मासेमारी सुरू होणार असल्याने कायम गजबजलेले हर्णै बंदरच दोन महिने सुने सुने राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button