
मान्सूनपूर्व पावसामुळे मे मध्येच हरचिरी धरण ’ओव्हर फ्लो’
मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात मागील सहा ते सात दिवसांपासून जोरदार कोसळत असल्याने, नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. रत्नागिरीतील एमआयडीसी आणि काही ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करणारे हरचिरी धरणही भरुन वाहू लागले असून, मे अखेरीस जाणवणारी पाणी टंचाई दूर झाली आहे. त्यामुळे उद्योगजकांचा आणि शहरालगतच्या ग्रामपंचायतींचा पाणीप्रश्न सुटला आहे. रत्नागिरीतील मिरजोळे आणि उद्यमनगर, शिरगाव एमआयडीसीला तालुक्यातील हरचिरी येथील एमआयडीसीच्या धरणामधून पाणी पुरवठा होतो.
उद्योजकांसह एमआयडीसीची पाईपलाईन असलेल्या गावांसह एकूण १० ते १२ ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा होत असतो. त्यामुळे मेच्या अखेरच्या टप्प्यात अनेकदा पाणी कपातीचा निर्णय एमआयडीसीला घ्यावा लागतो. परंतु यावर्षी १५ मे नंतरच अवकाळी पाऊस आणि त्यानंतर अरबीसमुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोसळणारा मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील पाण्याची कमतरता दूर केली. काजळीनदीलाही मोठ्याप्रमाणात पाणी आल्याने एमआयडीसीची सर्व धरणे भरुन वाहू लागली आहेत. हरचिरी येथील धरण वाहू लागल्याने, याठिकाणी बसवण्यात आलेल्या लोखंडी प्लेट काढण्यात आल्या आहेत.www.konkantoday.com