
फेडरल बँकेत खाते असलेल्या महिलेच्या नावाचे परस्पर क्रेडिट कार्ड प्राप्त करुन बँकेची आठ लाखांची फसवणूक
मोबाईल लिंकव्दारे रत्नागिरीतील फेडरल बँकेत खाते असलेल्या महिलेच्या नावाचे परस्पर क्रेडिट कार्ड प्राप्त करुन वेळोवेळी पैसे काढून सुमारे 8 लाख 85 हजार 29 रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी लातूर येथील अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना 25 मार्च 2022 ते 14 जून 2022 या कालावधीत मारुती मंदिर येथील फेडरल बँकेत घडली आहे.याबाबत फेडरल बँकेचे मॅनेजर सुमित विश्वनाथ बागडिया (35,रा.आरोग्य मंदिर,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानूसार,त्यांच्या बँकेत सायली सचिन पाटील (रा.चिंचखरी,रत्नागिरी) यांचे खाते आहे.त्यांच्या खात्याला लिंक असलेला मोबाईल क्रमांक हा सध्या लातूर येथील अज्ञात वापरत आहे.त्याव्दारे त्याने सायली पाटील यांच्या नावाचा क्रेडिट कार्डचे लिंक व्दारे पत्ता बदलून तो स्वतःचा लातूर येथील अशोक हॉटेल अमृता टॅ्रव्हल्स असा केला.तसेच त्याने सायली पाटील यांचे खाते असलेल्या फेडरल बँकेकडे मोबाईल लिंकव्दारे मागणी करुन सायली पाटील यांच्या नावाचे क्रेडिट कार्ड प्राप्त केले.त्यानंतर वेळोवेळी लातूर येथे एकूण 8 लाख 85 हजार इतकी रक्कम काढून अपहार करत बँकेची फसवणूक केली
www.konkantoday.com