रुग्णालयात कधी येणार? असे विचारले म्हणून ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरकडून धमकी
राजापूर : डॉक्टरने फोनवरून शिविगाळ करत बघून घेण्याची धमकी दिल्याची तक्रार राजापूर तालुक्यातील रायपाटण पोलिस दूरक्षेत्र येथे दाखल करण्यात आली आहे.
रायपाटण ग्रामीण रुग्णालयातील रजेवर असलेल्या डॉक्टरना रुग्णालयात कधी येणार? अशी विचारणा करणार्याला शिवीगाळ करीत बघून घेण्याची धमकी दिल्याची तक्रार पाचल येथील तुषार बबन जाधव यांनी पोलिसात दिली आहे. दि. 24 रोजी दुपारी 12:40 वाजता रायपाटण ग्रामीण रुग्णालयात येथे तपासणीसाठी गेले असता त्या ठिकाणी एकही डॉक्टर नसल्याचे निदर्शनास आले .
याबाबत स्टाफला विचारणा केली असता डॉक्टर राजकुमार चव्हाण हे दोन दिवसापासून रजेवर आहेत तर दुसरे डॉक्टर अभिजित पराडे बरेच दिवसांपासून रजेवर असल्याचे सांगितल्यावरून त्यांचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यांना फोन केला असता सुरुवातीला आपण आजारी असल्याचे सांगत नंतर वेगळ्याच विषयावर चर्चा सुरू केल्याने आपण फोन बंद केला होता. मात्र नंतर त्यानी पुन्हा फोन करून वेगळ्याच विषयावर बोलत असताना तू कोण आहेस? तुला बघून घेतो? असे म्हणत शिव्या घातल्या आणि फोन कट केला.
त्यानंतर जवळपास आठ ते नऊ मेसेज पाठवून त्यातून धमकी देण्याचा प्रयत्न केला आणि थोड्या वेळात तर ते सर्व मेसेज ऑल डिलीट करून टाकले. त्यामुळे डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करावी, अशी पोलिसात तक्रार दाखल केली आहे .