गवा रेड्याच्या हल्ल्यातील जखमी तरूणाचे दुर्दैवी निधन

0
165

गवा रेड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला आणि डेरवण रुग्णालयात गेले पाच दिवस उपचार घेत असलेल्या तरूणाचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. जखमीला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत होते. मात्र शरीरावर गंभीर जखमा असल्याने डॉक्टरचे प्रयत्न व्यर्थ ठरले.
चिपळूण तालुक्यातील फुरूस येथील तरूण सतीश जाधव हा दि. १९ रोजी नेहमीप्रमाणे गुरे चरावयास घेवून घराजवळ असणार्‍या जंगलात गेला होता. यावेळी त्याच्यावर गव्याने जोरदार हल्ला चढवला होता. गव्याने शिंगे सतीश याच्या पोटात खुपसून आतडीच बाहेर काढली होती. तात्काळ त्याला डेरवण येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी तीन साडेतीन तासाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र तरीही त्यांची प्रकृती नाजूक होती. पाच दिवस डेरवण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र उपचार सुरू असतानाच निधन झाले. www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here