कस्तुरीरंगन समितीच्या अहवालानुसार चिपळूण, खेड, लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुक्यातील एकूण 291 गावे इकोसेन्सिटीव्ह झोन मध्ये

केंद्रीय पर्यावरण व जलवायु परिवर्तन मंत्रालयाने इकोसेन्सिटीव्ह संदर्भात अधिसूचना काढली आहे. कस्तुरीरंगन समितीच्या अहवालानुसार चिपळूण, खेड, लांजा, राजापूर, संगमेश्वर या तालुक्यातील एकूण 291 गावे इकोसेन्सिटीव्ह झोन मध्ये आहेत.त्यानुसार या क्षेत्रातील लोकांना बांधकाम, खाण संदर्भातील प्रकल्पांवरही बंदी येणार आहे. त्याशिवाय 20 हजार स्क्वेअर फूटापेक्षा अधिक बांधकामांना मनाई करण्यात येणार आहे. यासंदर्भातील हरकती 60 दिवसात नोंदवणे आवश्यक आहे.

चिपळूण तालुक्यातील तिवरे, रिक्टोली, बामणोली, पेढे परशुराम, तिवडी, कादवड, नांदिवसे, मोरवणे, स्वयंदेव, खोपड, गणेशपूर, कळकवणे, गाणे, ओवळी, पेढांबे, कोळकेवाडी, अडरे, कामथे खुर्द, टेरव बु., मुंढे तर्फ चिपळूण, खरवते, अनारी, उभळे, शिरगाव, कुंभाली, कोंडमळा, कोंडफणसवणे, तळसर, पोफळी, कुडप, पोफळी बु., डेरवण, तुरंबव, मुंढे तर्फ सावर्डा, ढाकमोली, फुरुस, दुर्गवाडी खुर्द, दुर्गवाडी, मंजुत्री, तळवडे, पाथे, मजरेगोवळ, कुटरे या गावांचा समावेश आहे.

खेड तालुक्यातील तुळशी बु., तुळशी खुर्द, वडगाव बुद्रुक, शिवतर, कळंबणी खुर्द, कसबा, नातू, पाखरवाडी, दहीवली, वाडी बेलदार, दिवाणखवटी, वडगाव खुर्द, किंजळेतर्फ नातू, बिरामणी, कोंडवाडी, घेरापालगड, शिंगरी, पुरेखुर्द, जामगे, घेरा सुमारगड, कांदोशी, विहळी, किंजळेतर्फ खेड, नांदिवली, कळंबणी बु., वाडी मालदे, पोयनार खुर्द, साखरोळी खुर्द, तिसे खुर्द, अस्तान, घेरा रसाळगड, वाडीबीड, चाटव, प्रभूवाडी, देवघर, हुंबरी, खालची (हुंबरी), सनाघर, कर्टेल, चिंचवाडी, वरोवली, आंबवली, नवानगर, कुंभाड, नांदगाव, संगलट, शिरगाव, खोपी, निवे, बजरंगनगर, मोरवंडे खुर्द, चोरवणे, शिरगाव खुर्द, मिर्ले, शिव खुर्द, तळवट खेड, सापिर्ली, तळवट जावळी, चोरवणे उतेकरवाडी, तळवट पाल, कवळे, कासई, अष्टीमोहल्ला, साखर, भेलसई बुधवाडी, धामणंद, भेलसई चौथाई, वावे चिंचवाडी, धामणंद गावठाण, केळणे, जावळी गावठाण, झगडेवाडी, कुंभवली, कुरवळ गावठाण, आंबडस या गावांचा समावेश आहे.

लांजा तालुक्यातील वेसुर्ले, शिरंबवली, कोचरी, डाफळे, सालपे, कुरचुंब, चाफेट, कांगवली, वेरळ, चिंचुर्टी, खोरनिनको, पालू, आगरगाव, हसोळ, कुंभारगाव, प्रभानवल्ली, गुरववाडी, खानवली, वाघ्रट, कांटे, बुध्दवाडी वेरवली बु., माजळ, रामगाव, इसवली, जावडे, भांबेड, पूरगाव, कुडेवाडी, भडे, हर्दखळे, बापेरे, निवोशी, पुरंग, वाकेड, कोंडगे, पनोरे, विलवडे, रुण, आरगाव, खोरगाव, बोरथडे, हर्चे, कोंडगाव, रिंगणे यांचा समावेश आहे. तर राजापूर तालुक्यात झर्ये, वाटूळ, येरडव, कोंड दसुर, परुळे, चिखले, कोंडसर खुर्द, पांगारी खुर्द, तिवरे, धामणपे, हरळ, वरची गुरववाडी, कोतापूर, कोळवणखडी, सौंदळ, खिणगिणी, केळवडे, पाथार्डे, पाचल, आग्रेवाडी, भराडे, करक, हर्डी, गोठणे, दोनिवडे, ओशिवळे, वाळवड, कार्जिडा, फुपेरे, कोळंब, पहिलीवाडी (ताम्हाणे), जांभवली, मिळंद, बागकाझी हुसेन, हसोळ तर्फ सौंदळ एक गाव, पांगारी बु., सावडाव, हातदे, डोंगर, मोसम, महाळुंगे, पन्हळे तर्फ सौंदळ, शेजवली, वाल्ये, बांदिवडे, प्रिंदावणे, कुंभवडे, पाले या गावांचा समावेश आहे.

संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणी बु., शिरंबे, रातांबी, राजीवली, शिंदे आंबेरी, विकासनगर, आसवे, कासे, कुचांबे, कुटगिरी, पाचांबे, रांगव, आंबेत, मावळंगे, तुरळ, शेनवडे, कोंड भैरव, मासरंग, कातुर्डी कोंड, निवळी, गोळवली, श्रृंगारपूर, तांबेडी, अणदेरी, शेंबवणे, कुंभारखाणी खुर्द, हेदली, धामणी, डिंगणी, नायरी, पिरंदवणे, मांजरे, तिवरे घेराप्रचितगड, असुर्डे, मालदेवाडी, उंबरे, संगमेश्वर, उपळे, कोंड आंबेड, किंजळे, वाशी तर्फ संगमेश्वर, देवळे घेराप्रचितगड, कुळे, कुरधुंडा, फणसवळे, सायले, काटवली, ताम्हनले, कुंडी, निगुडवाडी, गोठणे, बेलारी बु., कोंड ओझरे, तळवडे तर्फ देवरुख, मठ धामापूर, चांदिवणे, बेलारी खुर्द, बामणोली, कळवण, आंगवली, कोंद्रण, देवघर, बोंडये, ओझरे बु. निवधे, चाफवली, निनावे, दखीण, मुर्शी, भडकंबा, भोवडे, किरबेट, देवडे, वाडी आदिष्टी या गावांचा समावेश आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button