रत्नागिरी जिल्ह्यात विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेचे आयोजन
रत्नागिरी : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागून त्यांच्यात विज्ञान व तंत्रज्ञान विषयक आवड निर्माण करणे, भविष्य काळातील विविध स्पर्धा परीक्षा व प्रवेश परीक्षांच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांची वाचन क्षमता विकसित करणे यासाठी ही परीक्षा महत्त्वाची ठरते. विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षा प्राथमिक गट – पाचवी ते सातवी व माध्यमिक गट – आठवी ते दहावी अशा दोन गटात घेण्यात येणार आहे. मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमात परीक्षा घेतली जाणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शाळांनी स्पर्धकांच्या याद्या व परीक्षा फी 13 ऑगस्टपर्यंत रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाकडे पाठवावी, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाकडून करण्यात आले आहे. यावर्षी मंडळाचे रौप्य महोत्सव असल्याने उपक्रमशील शाळांना सन्मानित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका प्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष रवींद्र इनामदार, कार्यवाह प्रभाकर सनगरे यांच्याशी संपर्क साधावा.