आजपासून या वस्तू होणार महाग

नवी दिल्ली : सोमवारपासून अनेक जीवनावश्यक वस्तू महाग होणार आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत जीएसटी दर वाढविण्याचा निर्णय झाला होता. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू होईल. दही, लस्सी, तांदूळ आणि पिठांसह अनेक वस्तूंचे दर वाढणार आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत दुग्धजन्य पदार्थ पहिल्यांदाच जीएसटीच्या कक्षेत आणले गेले होते. पॅकिंगचे दही, लस्सी आणि ताकावर 5 टक्के जीएसटी लागू करण्यासह अनब्रँडेड प्री-पॅकेज्ड आणि प्री लेबल पीठ तसेच डाळींवरही 5 टक्के जीएसटी आता लागू होणार आहे.
बिझनेस क्लासवर कर
अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा, बागडोगराहून उड्डाण घेणारी विमाने आजवर करमुक्त होती. त्यातही आता केवळ इकॉनॉमी क्लासवर सूट मिळेल. बिझनेस क्लासमध्ये प्रवास करावयाचा असल्यास 18 टक्के दराने जीएसटी द्यावा लागेल.
जीएसटी संकलनात वाढ
जून महिन्यात जीएसटी संकलनात वाढ झाली असून, तो 1.45 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षातील जूनच्या तुलनेत ही वाढ 56 टक्के अधिक आहे. मे महिन्यात 1.41 लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते.
सद्यस्थितीत हॉटेल रूमपोटी दिवसाला एक हजार रुपयांहून कमी भाडे असेल, तर त्यावर जीएसटी आकारणी होत नव्हती. आता मात्र अशा रूमपोटी द्यावयाच्या भाड्यावरही 12 टक्के दराने जीएसटी लागू असेल.
सद्यस्थितीत हॉटेल रूमपोटी दिवसाला एक हजार रुपयांहून कमी भाडे असेल, तर त्यावर जीएसटी आकारणी होत नव्हती. आता मात्र अशा रूमपोटी द्यावयाच्या भाड्यावरही 12 टक्के दराने जीएसटी लागू असेल.
हॉस्पिटलकडून 5 हजार रुपये दिवसाला रूमपोटी आकारले जात असतील, तर त्यावर 5 टक्के दराने जीएसटी देय असेल. आयसीयू, आयसीसीयू, एनआयसीयू रूमला मात्र सवलत लागू असेल.
गोदाम सेवेवरही जीएसटी
गोदामांतून सुकामेवा, मसाले, खोबरे, गूळ, कापूस, ताग, तंबाखू, चहा, कॉफी आदी साठविण्याच्या सेवा जीएसटी कक्षेत आल्या आहेत. त्यावर 12 टक्के दराने जीएसटी लागेल. कृषी उत्पन्नासाठीच्या ‘फ्युमिगेशन’ सुविधेवरही कर नव्हता. आता त्यावरही 18 टक्के जीएसटी असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button