स्वरूपानंद पत संस्थेच्या ठेवीदारांनी मुदती पूर्वीच 10 कोटी ठेव संकलनाचा इष्टांक पूर्ण करून विश्वासार्ह स्वरूपानंद पतसंस्था ही बिरुदावली अधोरेखित केली:- अँड दीपक पटवर्धन
16 जुलै रोजी स्वरूपानंद चा ठेव वृद्धीमास पूर्ण होण्यास 4 दिवस बाकी असताना 732 ठेवीदारांनी 10 कोटी 11 लाखांची नवीन ठेव संस्थे मध्ये गुंतवून 19 जुलै रोजी मी जाहीर केलेले 10 कोटी ठेव संकलनाचे उद्दिष्ट मुदती पूर्वी परिपुर्ण केले.
ठेवोत्सवा मधिल उत्सवी भावनिक गुंतवणूक
स्वरूपानंद आपला ठेव वृद्धीमास हा सर्व ठेवीदारांच्या सहभागाने ठेवोत्सवा सारखा साजरा करत असते त्या उत्सवात ठेवीदार भावोत्कट गुंतवणूक करत असतात विश्वासार्हतेच्या भावबंध संस्था आणि ठेवीदार यांनी मिळून बळकट पणे विणले आहेत याची प्रचिती प्रत्येक ठेव वृद्धीमासा मध्ये घेताना आनंद होतो.
मार्च अखेर 275 कोटींच उद्दिष्ट साध्य करायचाय
संस्थेच्या एकूण ठेवी आता 259 कोटी 70 लाखांच्या घरात पोचल्या असून 20 जुलै पर्यंत 260 कोटींची वेस ओलांडून मार्च अखेर पर्यंत 275 कोटींचा ठेव टप्पा ओलांडून संस्था 300 च्या टप्प्याकडे मार्गस्थ होईल.
सुदृढ आर्थिक स्थिती
स्वरूपानंद पत संस्था गुंतवणूक दारांचा विश्वास जपत ठेव संरक्षित करू शकणारी आर्थिक स्थिति कटाक्षाने कायम राखत आली, सुदृढ आर्थिक स्थिती, सातत्यपूर्ण वाढी चे प्रमाण, 99% च्या वर असलेली वसुली चे प्रमाण, 133कोटीची सुरक्षित गुंतवणूक ,31 कोटींचा स्वनिधी सातत्याने वाढणारा निव्वळ नफा, 308 कोटींचे खेळते भांडवल याच बरोबर प्रशिक्षित सेवाभावी पारदर्शक पद्धतीने काम करणारे कर्मचारी, संगणकाची साथ घेऊन अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत दिलेल्या अद्ययावत अचूक वेगवान सेवा , सोनेतारण ही लोकप्रिय कर्ज योजना अश्या अनेक योजना मधून जनमानसात निर्माण केलेले विश्वासार्ह ,उपयुक्त स्थान यातून राज्यस्थरावर निर्माण झालेली उत्तम प्रतिमा. 17 शाखांच्या माध्यमातून जोडलेला 40 हजारांचा सभासद ग्राहक वर्ग ही संस्थेची शक्तीस्थान आहेत. सेवाभावी वृत्तीने विश्वस्थाच्या जागृत भूमिकेतून काम करणार संचालक मंडळ अश्या या टीमवर्क मूळे स्वामी स्वरूपानंद पत संस्था विस्थारत आहे.
पुढील 3 दिवस सायंकाळी 4 पर्यंत ठेवी स्वीकारणार
उर्वरित 4 दिवसात अधिक मोठ्या प्रमाणावर ठेवीदार संस्थे मध्येठेव गुंतवतील आणि ठेव वृद्धी मासात आज पर्यंत ची विक्रमी ठेव रक्कम संस्थेत जमा होईल असा विश्वास पटवर्धन यांनी व्यक्त करतांना 20 तारखे ला चेक ने रक्कम न गुंतवता rtgs neft माध्यमातून कक्कम गुंतवावी म्हणजे अखेरच्या दिवशी चेक वाटण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही व 20 जुलै रोजीच ठेव रक्कम संस्थकडे जमा होईलअसे पाहावे अशी विनम्र सूचना करतानाच पुढचे 3 दिवस सायंकाळी 4 पर्यंत म्हणजे बँकिंग अवर्स नंतर ही ठेव गुंतवणूक करता येईल ठेवीदारांची होणारी गर्दी पाहून सोय म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे स्वरूपानंद च्या ठेव योजनेत गुंतवणूक दारांनी गुंतवणूक करून संस्थेच्या सुरक्षित विश्वासार्ह ठेव योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन अँड दीपक पटवर्धन यांनी केले आहे.