
गुहागर-चिपळूणचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी बाहेरून टीम आणणार -आ. भास्कर जाधव
निसर्ग चक्रीवादळाचा फटका गुहागर व चिपळूण तालुक्याला बसला असून तालुक्यात ७०० हून अधिक विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने या परिसरात विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. सध्याच्या महावितरणाच्या यंत्रणेप्रमाणे काम केल्यास विद्युत पुरवठा सुरू होण्यास मोठा कालावधी लागू शकतो. यासाठी तात्काळ बाहेरून टीम आणावी लागेल. हे कामगार बाहेरून येणार असल्यामुळे त्यांना कॉरंटाईन करण्यात येवू नये अशी मागणी जाधव यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली. त्याला जिल्हाधिकार्यांनी मान्यता दिली असल्याचे जाधव यांनी सांगितले.
www.konkantoday.com