
रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्याकडून वर्षभरात २२८ पशुंवर हल्ला
बिबट्यांचा मनुष्य वस्तीजवळील वावर वाढलेला असून खाद्यासाठी पशुधनावर हल्ले करू लागले आहेत. मागील आर्थिक वर्षातरत्नागिरी जिल्ह्यात चार तालुक्यांत २२८ पशुंवर बिबट्याने हल्ला केला आहे. मृत पशुंच्या मालकांना शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाते. त्यानुसार आतापर्यंत १५८ पशुपोटी १७ लाख ७ हजार ४७५ रूपयांचे वाटप केले असून ६५ पशुपोटीचे ५ लाख ७० हजार रूपयांचे वितरण करणे शिल्लक आहे.
रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा व राजापूर या चार तालुक्यांत बिबट्याकडून गायी, गुरांसह शेळ्यांवर हल्ला केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यात वनक्षेत्र कमी असल्यामुळे जवळच्या लोकवस्तीजवळ खाद्याच्या शोधार्थ बिबट्याचा वावर आढळत आहे. कुत्रे, मांजर, गायी-गुरे हे बिबट्याच्या हल्ल्याचे बळी ठरू लागले आहेत.
www.konkantoday.com