प्लास्टिकचा वापर कराल तर दंड भरण्याची तयारी ठेवा , रत्नागिरीतील ४३ व्यापार्‍यांना ५४ हजारांचा दंड

0
45

रत्नागिरी शहरात नगर परिषद प्रशासनाकडून एकल वापर प्लास्टिक वापरासंदर्भात वेळोवेळी केलेल्या कारवाईत आतापर्यंत ४३ व्यापार्‍यांवर कारवाई करण्यात आली. एकल प्लास्टिक न वापरण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्या व्यापार्‍यांकडून ५४,५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे गेल्या जून महिन्यात एकल प्लास्टिक वापराबाबत जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. एकल वापर होणार्‍या प्लास्टिकच्या विविध वस्तूंऐवजी निसर्गपूरक इतर अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने कापडी पिशव्या, बांबू, लाकडी वस्तू, सिरामिक्सच्या प्लेट, वाट्या आदी चांगले पर्याय आहेत. नागरिकांनी अशा निसर्गपूरक वस्तुंचा वापर अधिकाधिक करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here