
डी कॅडमध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम
देवरुख ः देवरूख डी- कॅड कला महाविद्यालयात दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दोन वर्षाचा डिप्लोमा इन अप्लाय आर्ट या उपयोजित कलेशी निगडित शासनमान्य कोर्स उपलब्ध झाल्याची माहिती अजय पित्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जूनपासून हा कोर्स सुरू होणार आहे. पत्रकार परिषदेला विजय विरकर, प्रा. रणजित मराठे उपस्थित होते.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन ज्यांना कलेची आवड आहे; परंतु त्यांना कमीत कमी वेळेत मूलभूत शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देणे गरजेचे आहे, यासाठी डी-कॅडने रोजगाराभिमुख डिप्लोमा चालवण्यासाठी संलग्नतेसाठी महाराष्ट्र राज्य व्यावसायिक शिक्षण मंडळाशी संपर्क साधला. या कोर्ससाठी आता मान्यता मिळाली आहे, असे पित्रे यांनी सांगितले.