
रत्नागिरीत टाळ-मृदुंगावर घुमला विठूमाउलीचा गजर; मारुती मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत पायी दिंडी…
रत्नागिरी : प्रत्येकवेळी प्रत्येकाला पंढरपूरला वारीत जाणे शक्य होत नाही. अशा वेळी रत्नागिरी शहरातील प्रति पंढरपूर असलेले विठ्ठल मंदिर येथे जाऊन विठुरायाच्या दर्शनाची तहान भाविक भागवितात. विठू माउली तू, माउली जगाची, माउलीत मूर्ती विठ्ठलाची… विठ्ठला.. मायबापा… असे म्हणत विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. आषाढी एकादशीनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. विविध ठिकाणच्या दिंड्या येथे दाखल झाल्या झाल्या. भजन-कीर्तन, नामघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला आहे. यंदा भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. भाविकांची दर्शनासाठी गैरसोय होऊ नये, म्हणून नियोजन करण्यात आले होते. आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरीतील मारुती मंदिर ते प्रति पंढरपूर असणार्या विठ्ठल मंदिरापर्यंत पायी दिंडी काढण्यात आली. रत्नागिरी शहरात प्रथमच झालेल्या या वारीने सार्यांचेच लक्ष वेधून घेतले.पावसानेही विश्रांती दिल्याने ही दिंडी निर्विघ्न पार पडली.







