समीर चांदरकर यांनी लाईटच्या बल्बमध्ये विठुरायाचं रूप साकारलं
कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी आषाढी एकादशीचा उत्साह पंढरपुरात दिसत आहे.लाखो वारकरी विठुमाऊलीच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल होत आहेत. दरम्यान, कला क्षेत्रातील कलाकार मंडळी ही आपल्या कलेच्या माध्यमातून विठुमाऊलीच्या चरणी आपली भक्तीसुमने अर्पित करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील वराडकर हायस्कूल, कट्टा येथील कलाशिक्षक समीर चांदरकर यांनीही आपल्या कलेच्या माध्यमातून विठुरायाचं आगळं वेगळं रूप साकारलं आहं.
समीर चांदरकर यांनी लाईटच्या बल्बमध्ये विठुरायाचं रूप साकारलं आहे. चांदरकर यांनी बल्बमध्ये केवळ तीन सेंटीमीटर उंचीची मातीची नयनरम्य मूर्ती साकारली आहे.
www.konkantoday.com