पूर फाट्यावर दुचाकी स्वाराचा अपघात
देवरूख : नव्याने डांबरीकरण केलेल्या देवरूख-तळेकांटे रस्त्यावर पाटगाव घाटीत तेलाचा तवंग आल्याने त्यावरून घसरून दुचाकीस्वाराचा अपघात झाला. याठिकाणी दुचाकी घसरत असल्याने येथे रस्त्यावरच सावधानतेचे दगड ठेवण्यात आले आहेत. दुचाकी चालकांनी सावधानता पाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.