अलोरे येथे प्रौढाला मारहाण
चिपळूण:- तालुक्यातील अलोरे येथे प्रौढाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. रवींद्र कृष्णा मोहिते असे मारहाणीत जखमी झालेल्या प्रौढाचे नाव आहे. मोहिते यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय विनायक सुर्वे (चिपळूण), प्रशांत सावर्डेकर (पुंभार्ली, चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र मोहिते हे रविंद्र सुर्वे यांच्याकडून उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी चालत जात असताना संजय सुर्वे, प्रशांत सावर्डेकर यांना रवि कुठे आहे? असे विचारले. रवी कोण आम्ही ओळखत नाही, आम्हाला का विचारतोस? असे म्हणत संजय आणि प्रशांत याने रवींद्र मोहिते यांना डोक्यात डाव्या डोळ्यावर, नाकावर दांडक्याने मारहाण केली, यामध्ये त्यांना दुखापत झाली. याबाबतची फिर्याद अलोरे पोलीस स्थानकात दिल्यानंतर संजय विनायक सुर्वे, प्रशांत पांडुरंग सावर्डेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.