
राऊत म्हणाले रत्नागिरीत भगवा फडकणार, त्यांच्या मताशी मी सहमत आहे -माजी मंत्री उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक झाली तर येथे शिवसेनेचाच झेंडा फडकणार, आता निवडणूक घ्या, उदय सामंत पराभूत होतील,” असा टीका शिवसेनेचे नेते, खासदार विनायक राऊत यांनी आमदार उदय सामंत यांच्यावर केली आहे.त्याला सामंतांनी प्रत्युत्तर दिलं.
“विनायक राऊतांनी माझ्यावर टीका केली, मी त्यांच्याविषयी काही बोलावं, हा माझा स्वभाव नाही, एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाताना मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली नाही. कुणाशीही भांडण केले नाही, त्यांच्यावर टीका करण्याइतका मी मोठा नाही. विनायक राऊतांनी अनेकांवर टीका केली. शिवसेनेचे सचिव म्हणून त्यांची टीका योग्यच आहे,” असे सामंत म्हणाले.
“ज्यांनी मला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले. तेच आज असे विधान करीत आहेत, यांची खंत वाटते. त्यांनी माझ्यावर टीका केली म्हणून मी त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही, मी शिवसेनेतच आहे. शिवसेना वाचविण्यासाठी मी शिंदेसोबत जाण्याची भूमिका घेतली म्हणून ते माझ्यावर टीका करीत आहेत,”असे सामंत म्हणाले.
“घटकपक्षांनी शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला, ती संपवू नये, यांचा विडा एकनाथ शिंदेंनी उचलला, त्याला मी समर्थन दिलं. मी राजकारणाची तत्वे पाळणारा आहे. राजकारणावर माझे पोट नाही, मी निवडणूक आलो काय की पराभूत झालो काय, मी समाजसेवा करणार. आजही मला उद्धव ठाकरे, विनायक राऊत यांच्याबाबत आदर आहे. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत त्यामुळे राऊत म्हणाले रत्नागिरीत भगवा फडकणार, त्यांच्या मताशी मी सहमत आहे, रत्नागिरीत भगवा फडकणार,” असे सामंत म्हणाले.
www.konkantoday.com