पोस्ट खात्याची पेन्शन अदालत 14 रोजी
रत्नागिरी : पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांच्याद्वारे 14 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी येथे टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी पेन्शन अदालत आयोजित केली आहे. निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तीवेतनधारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारी ज्यांचे तीन महिन्यांच्या आत निपटन झालेले नाही अशा प्रकरणांचा या अदालतमध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये कायदेशीर प्रकारणे, नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार आणि नीती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.