मनसेचे वैभव खेडेकर यांना जीवे मारण्याची धमकी

0
59

खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांना फोन करून अज्ञाताने सुमारे एक महिन्यांपूर्वी धमकावले होते. दि. ४ जून रोजी रात्री १०.३० वाजता हा प्रकार घडला होता. त्यानंतर मंगळवारी दि. ५ रोजी पुन्हा खेडेकर यांना अज्ञात इसमाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात देखील तक्रार केली आहे. खेडमध्ये मनसेतर्फे जून महिन्यात महाआरती करण्यात आल्यानंतर मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांना अज्ञाताने फोन वरून धमकी दिली होती. त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ‘मी तुझ्या घरी येतो, मग पळून जाऊ नको’ असे म्हणत त्याने धमकावले होते. या घटनेनंतर एक महिन्याच्या अंतराने मंगळवारी दि. ५ रोजी वैभव खेडेकर यांना पुन्हा एकदा धमकी दिली आहे. याबाबत मंगळवारी सायंकाळी उशिरा त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here