
पावसाचा फटका! कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी येथील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली
वैभववाडी : तालुक्याला दिवसभर मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी रेल्वे स्टेशन नजीक रुळावर पाणी भरल्याने रेल्वे वाहतूक संथगतीने सुरू होती.
दोन्ही रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले होते.
वैभववाडी – तरळे मार्गावर ठिकठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत होते त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली होती. त्याचबरोबर उंबर्डे – वैभववाडी मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पावसाचा फटका करुळ घाटमार्गाला बसला. करुळ घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या. मात्र वाहतूक सुरू आहे. तालुक्यातील सुख व शांती या प्रमुख नद्या चालू वर्षी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत होत्या. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. मात्र काही काळाने पाणी ओसरले. त्याचबरोबर तरळे – वैभववाडी मार्गावर घंगाळे नजीक रस्त्यावर पाणी आले होते. वैभववाडी – उंबर्डे मार्गावर सोनाळीनजीक रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.