
स्वराज्य प्रतिष्ठान लांजा यांचे सापुचेतळे येथे जंतुनाशक फवारणी
कोरोनाच्या संकटात अख्खा देश सापडलेला असताना या आजाराचा मुकाबला करण्यासाठी स्वराज्य प्रतिष्ठान लांजा या संस्थेच्या वतीने आणि प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय ऋषीनाथ दादा पत्याणे यांच्या मार्गदर्शनातून या आजाराचा मुकाबला करण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. सापुचेतळे येथे नेहमीच लोकांची वरदळ असते अशा ठिकाणी पूर्ण सापुचेतळे विभागामध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली.या कामी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रमिल दादा पत्याणे ,संतोष ( बावा) पत्याणे, अध्यक्ष विनायक खानविलकर, उपाध्यक्ष डी.डी. कुर्धेकर,प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सहकारी बाबा गोरे,उमेश लोटणकर,सुजित शिंदे, हेमंत शिंदे, वाघ्रट वाडीलिंबुचे सरपंच देवेंद्र लोटणकर, पोलीस पाटील बाबू लोटणकर उपस्थित होते .
या प्रतिष्ठानच्या जनसेवेच्या कार्यासाठी खास उपस्थिती होती ती निर्माता ,मराठी अभिनेता संचित यादव आणि अभिनेत्री पौर्णिमा यांची यावेळी अभिनेता संचित म्हणाला देशावर संकट आलेलं असताना या देशसेवेच्या कार्यासाठी आम्हाला छोटासा भाग होता आल याचा आम्हाला आनंद आहे .