एका दिलानं नांदायचं रं, धर्मासाठी झुंजायचं रं…महिमत गडावर दुर्गवीर प्रतिष्ठानची श्रमदान व संवर्धन मोहीम
देवरूख : एका दिलानं नांदायचं रं, धर्मासाठी झुंजायचं रं अशा स्फूर्तिदायक गाण्यांच्या उत्साहात निगुडवाडी येथे महिमत गडावर रविवारी दुर्गवीर प्रतिष्ठानच्यावतीने श्रमदान व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. मोहिमेमध्ये गडावरील भग्न अवस्थेत व दुर्लक्षित असलेल्या धान्य कोठारचे जे अवशेष शिल्लक आहेत, त्या कोठाराच्या आतील एका भागातील दगड मातीचा ढिगारा मोकळा करून दगड व मातीचे वर्गीकरण करून ठेवण्यात आले. तसेच धान्य कोठाराच्या आसपासचे गवत काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. उर्वरित भाग पुढील मोहिमेत मोकळा करण्याचा दुर्गवीरांचा मानस आहे. या मोहिमेमध्ये एकूण २४ दुर्गवीर सहभागी झाले होते. तसेच निगुडवाडीचे ग्रामस्थ रोहित गुरव त्याचबरोबर देवरूख पोलिस ठाणे येथील निगुडवाडी बीट अंमलदार जाधव, निगुडवाडी येथील पोलिस पाटील मनोहर जाधव यांनी महिमतगडाला भेट देऊन दुर्गवीरच्या कार्याचे कौतुक केले. मोहिमेत सौरभ सावंत, रोहीत बालडे, कुमार सरवदे , निशांत जाखी, संदेश रसाळ, मंगेश शिवगण, प्रथम घडशी, विराज नटे, साईराज भुवड, सिद्धेश केदारी, यश सावंत, शिवम सावंत, अमित कदम, साहिल मांजरेकर, मोहित लोटणकर, राहुल रहाटे, उत्कर्ष माने, तेजस घडशी, प्रणव राक्षे, अर्जुन दळवी, सुरेश उंडरे, प्रशांत डिंगणकर, महेश सावंत, रोहित कदम हे दुर्गवीर सहभागी झाले होते.