रायगड जिल्ह्यातही सोमवारपासून चौथ्या टप्प्याची नियमावली लागू ,अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना दिलासा मिळणार

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या आदेशान्वये राज्यातील कोविड-19 विषाणूच्या प्रादूर्भावाच्या अनुषंगाने जिल्हानिहाय रुग्णसंख्येनुसार असलेला Positivity Rate व Oxygen Bed ची उपलब्धता तसेच राज्याची एकूण ऑक्सीजन उत्पादन व प्रत्यक्षात ऑक्सीजनची आवश्यकता इ. बाबींचा सर्वकष विचार करून लागू करावयाच्या निर्बंधाबाबत विविध स्तर (Level’s) निश्चित केलेले आहे.
त्यानुसार पोलीस अधीक्षक, रायगड यांच्या कार्यक्षेत्रातील भाग हा चौथ्या स्तरामध्ये (Level-4) अंर्तभूत होत असून, शासन आदेशानुसार या स्तरासाठी लागू केलेले निर्बंध दि.07 जून 2021 पासून पोलीस अधीक्षक, रायगड यांच्या कार्यक्षेत्राताकरीता लागू करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधीक्षक रायगड यांच्या कार्यक्षेत्रात सोमवार, दि.07 जून 2021 रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून पुढील आदेश होईपर्यंत यापूर्वी लागू केलेल्या निर्बंधाच्या अनुषंगाने खालील सुधारीत आदेश जारी केले आहेत….
1. विविध प्रकारच्या अर्थिक सामाजिक बाबीसंदर्भात निर्बंध :-

  1. सर्व अत्यावश्यक वस्तूंची व सेवांची दुकाने / आस्थापना या संपूर्ण आठवडाभर दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. 2. अत्यावश्यक बाबींशी निगडीत नसलेली दुकाने / आस्थापना या पूर्णतः बंद राहतील.
  2. मॉल्स / चित्रपटगृहे (मल्टीप्लेक्स किंवा सिंगल स्क्रीन), नाट्यगृहे पूर्णतः बंद राहतील.
  3. उपहारगृहामधून (Restaurants) ऑर्डरप्रमाणे पदार्थ घेऊन जाणे (Take away orders), पार्सल (Parcels) देणे, घरपोच सेवा (Home Delivery) देणे इ. परवानगी असेल.
  4. लोकल सेवा (Local Trains) ही केवळ वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवांकरीता (उदा. वैद्यकीय सेवा, शासकीय सेवा, विमानतळ व बंदरे सेवा इ. निगडीत व्यक्ती) मर्यादीत राहील.
  5. सार्वजनिक ठिकाणे / मोकळ्या जागेत सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 5.00 वाजलेपासून ते सकाळी 9.00 वाजेपर्यंत चालणे, सायकलिंग करणे यास मान्यता राहील. परंतु शनिवार व रविवार चालणे, सायकलिंग करणे या बाबी अनुज्ञेय राहणार नाहीत.
  6. केवळ मान्यता प्राप्त / सूट देण्यात आलेली खाजगी कार्यालये विहित क्षमतेच्या मर्यादेत उपस्थितीच्या अधिन सुरु राहतील.
  7. कोव्हिड 19 व्यवस्थापना संबंधीत कामकाज पाहणाऱ्या व अत्यावश्यक (Emergency) सेवेशी निगडीत कार्यालयांमध्ये 100 % उपस्थिती अनुज्ञेय राहील. इतर सर्व शासकीय कार्यालये (खाजगी कार्यालयांना परवानगी दिली असल्यास तीसुध्दा) ही केवळ २५% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु राहतील. अधिकच्या उपस्थितीची आवश्यकता असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे परवानगी घेणे आवश्यक राहील.
  8. बाह्य मैदानी खेळास (Outdoor Sports) सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 5.00 वाजले पासून ते सकाळी 9.00 वाजेपर्यंतच्या कालावधीत मान्यता राहील. तथापि बाह्य मैदानी खेळ (Outdoor Sports) शनिवार व रविवार या दिवशी अनुज्ञेय राहणार नाहीत.
  9. चित्रिकरण करताना अलगिकरण कक्ष (Quarantine Bubble) म्हणजेच चित्रीकरणाच्या ठिकाणी अथवा त्याच्या जवळपास जेथून सार्वजनिक परिवहन सेवेचा वापर न करता समर्पित परिवहन सेवेच्या माध्यमातून (Dedicated Transport Service) संबंधित व्यक्ती, कलाकार तसेच कर्मचारी यांची वाहतूक करता येईल अशा ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करणे व जमाव न जमवता चित्रिकरण करणे बंधनकारक राहील. तसेच सोमवार ते शुक्रवार या कालावधीत चित्रिकरण ठिकाणावरून सायंकाळी 5.00 नंतर कोणतेही प्रकारच्या वाहतूकीस मान्यता राहणार नाही. तर शनिवार व रविवार चित्रिकरणसाठी वाहतूक करता येणार नाही.
  10. सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत.
  11. लग्न समारंभासाठी 25 पेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती अनुज्ञेय राहणार नाही.
  12. अनावश्यक गर्दी न होऊ देता (Non Covid व्यक्तींसाठी) आवश्यक शारिरीक अंतर (Physical distance) ठेवून कमाल 20 व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पाडता येतील,या बाबीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्राधिकरण / प्रशासन यांची राहील.
  13. स्थानिक स्वराज्य संस्था / सहकारी संस्था यांच्या बैठका / निवडणूका या एकूण क्षमतेच्या 50 % मर्यादेत पार पाडता येतील.
  14. ज्या ठिकाणी बांधकाम मजूर प्रत्यक्ष बांधकाम ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्याच ठिकाणी बांधकाम चालू ठेवण्यास परवानगी राहील. बांधकाम साईटवर बांधकाम साहित्यासाठी होणान्या वाहतुकी व्यतिरिक्त अन्य प्रकारची वाहतूक टाळण्यात यावी.
  15. कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व दुकाने / आस्थापना सोमवार ते शुक्रवार दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच शनिवारी व रविवारी सदर दुकाने / आस्थापना बंद राहतील.
  16. ई-कॉमर्स सेवेद्वारे ही केवळ आवश्यक वस्तू व सेवांच्या पुरवठ्यास परवानगी राहील.
  17. कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी पर्याप्त कारणाशिवाय किंवा मान्यता प्राप्त बाबींशिवाय अन्य कारणांकरीता जाता येणार नाही.
  18. व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर / सेंटरर्स, स्पा, वेलनेस सेंटरर्स हे दुपारी 4.00 वाजेपर्यंत 50 % क्षमतेच्या मर्यादेत सुरु राहतील. तथापि, पुर्वीनियोजीत भेटी ठरवून, लसीकरण झालेल्या ग्राहकांनाच प्रवेश अनुज्ञेय असेल. तसेच सदर आस्थापनांमध्ये वातानुकूलन (Air Conditioners) यंत्रणा सुरु ठेवता येणार नाही.
  19. सार्वजनिक बस वाहतूक एकूण क्षमतेच्या 50% प्रवाशांच्या मर्यादेत सुरु राहील. प्रवाशांना उभे राहून प्रवास करणे अनुज्ञेय नसेल.
  20. माल वाहतूक (Cargo Movements) नियमितपणे सुरु राहील. सदर वाहनामध्ये जास्तीत जास्त 3 व्यक्तींना (Driver / Helpers / Cleaners or Others) प्रवास अनुज्ञेय असेल.
  21. खाजगी कार/ टॅक्सी/बसेस लांब पल्याच्या रेल्वे गाड्या यांच्या माध्यमातून आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत, जर असे प्रवासी पाचव्या स्तरात (Leval-5) अंतर्भूत असलेल्या जिल्ह्यातून अथवा तेथे थांबून पुढे प्रवास करीत असतील तर अशा प्रवाश्यांकडे ई-पास असणे आवश्यक आहे. अशाप्रकारे ज्या प्रवाश्यांकडे ई-पासची असणे आवश्यक आहे, त्याबाबतीत वाहनातील सर्व प्रवाश्यांकडे वैयक्तीक ई-पास असणे आवश्यक असून, प्रवासी वाहनास स्वतंत्र ई-पासची आवश्यकता असणार नाही.
  22. मालाच्या निर्यात करणाऱ्या उत्पादन उपक्रमांमध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसह एकूण क्षमतेच्या 50 % मर्यादेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करता, समर्पित वाहतूक व्यवस्थेद्वारे (Dedicated Transport Service) म्हणजेच Transport Bubble च्या माध्यमातून कामगारांची वाहतूक व उपस्थिती अनुज्ञेय राहील.
  23. अत्यावश्यक असलेल्या बाबींची निर्मिती करणारे उपक्रम (त्यामध्ये अत्यावश्यक बाबी व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची निर्मिती / पॅकेजिंग व्यवस्था, त्याचा पुरवठा करणारी साखळी यांच्यासह), ज्या कंपन्यांची उत्पादन प्रक्रिया अखंडीत चालू राहणे (Continuous Processing Industry) अनिवार्य आहे असे उपक्रम, देशाचे संरक्षणसाठी आवश्यक बाबींचे उत्पादन करणारे उपक्रम, डाटा सेंटर / क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हाईडर / टेलिकॉम सर्विस / आयटी सर्व्हिसेस सपोर्टिंग क्रिटीकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व्हिसेस या उपक्रमामध्ये एकूण क्षमतेच्या 50% मर्यादेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करता, समर्पित वाहतूक व्यवस्थेद्वारे (Dedicated Transport Service) म्हणजेच Transport Bubble च्या माध्यमातून कामगारांची वाहतूक व उपस्थिती अनुज्ञेय राहील.
    25.अत्यावश्यक बाबी, अखंडित उत्पादन प्रक्रिया व निर्यात करणाऱ्या उत्पादन उपक्रमांव्यतिरिक्त अन्य उत्पादन उपक्रम हे एकूण क्षमतेच्या 50% मर्यादेत, अलगिकरण कक्ष (Quarantine Bubble) म्हणजेच उपक्रमाच्या ठिकाणी अथवा त्याच्या जवळपास आवश्यक मनुष्यबळाच्या रहाण्याची व्यवस्था करून, जेथून सार्वजनिक परिवहन सेवेचा वापर न करता समर्पित परिवहन सेवेच्या माध्यमातून (Dedicated Transport Service) आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध केले जाईल या अधिनतेने सुरु राहतील.
    2.अत्यावश्यक सेवेमध्ये अंतर्भूत बाबी :-
  24. रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधालये, औषधी कंपन्या आणि इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यामध्ये त्याकरीता सहाय्यभूत उत्पादन व वितरण संस्था व त्यांची वाहतूक व पुरवठा साखळी तसेच लसीचे उत्पादन व वितरण, निर्जंतुकीकरण (Sanitizers), मुखपट्टी (Mask), वैद्यकीय उपकरणे, कच्चा माल पुरविणाऱ्या संस्था आणि सहाय्यभूत सेवा.
  25. पशुवैद्यकीय सेवा / जनावरांची देखभाल व निवारा केंद्र आणि पाळीव प्राण्यांच्या खाद्याची विक्री करणारी दुकाने
  26. वन विभागाने वनीकरणासंबधीत घोषीत केलेले सर्व उपक्रम.
  27. विमानचालन आणि त्यासंबंधी सेवा (विमान कंपन्या, विमानतळ, देखभाल, माल, कॅटरींग, इंधन भरणे,सुरक्षा इ.)
  28. किराणा सामान, भाजीची दुकाने, फळ विक्रेते, चिकन मटन / मासे विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने.
  29. शितगृहे (Cold Storage) आणि गोदाम सेवा (Warehousing Services). 7. सार्वजनिक वाहतूक ट्रेन्स, टॅक्सी, ऑटो आणि सार्वजनिक बसेस.
  30. विविध देशांच्या दूतावासांच्या (Dimplomates) कार्यालयाशी संबंधित सेवा.
  31. स्थानिक प्राधिकरणांकडून केली जाणारी मान्सूनपूर्व तयारी कामे.
  32. स्थानिक प्राधिकरणांकडून दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक सेवा.
  33. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्यांनी अत्यावश्यक म्हणून घोषीत केलेल्या सेवा 12. सेबी आणि सेबीमध्ये नोंदणीकृत असलेल्या संस्था उदा. स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज आणि क्लियरिंग कॉर्पोरेशन इ.
  34. दूरसंचार संबंधी सेवांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आवश्यक सेवा.
  35. मालाची वाहतूक.
  36. पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा.
  37. शेतीशी संबंधित उपक्रम आणि सर्व निगडीत क्रिया ज्या शेती उपक्रम अखंडित सातत्याने सुरु ठेवण्यासाठी आवश्यक आहेत, ज्यामध्ये शेतीसाठी आवश्यक बाबी बियाणे, खते, उपकरणे आणि दुरुस्ती यासारख्या बाबींचा समावेश आहे.
  38. सर्व वस्तूंची आयात व निर्यात
  39. ई-कॉमर्स (केवळ आवश्यक वस्तू व सेवांच्या पुरवठ्यासाठी)
  40. अधिकृत प्रसारमाध्यमे (Accredited Media)
  41. पेट्रोल पंप व पेट्रोलियम पदार्थाशी निगडीत सेवा, ज्यामध्ये Offshore / Onshore उत्पादनांचा समावेश राहील.
  42. सर्व मालवाहू सेवा.
  43. डाटा सेंटर / क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हाईडर / टेलिकॉम सर्विस / आयटी सर्व्हिसेस सपोर्टिंग क्रिटीकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व्हिसेस,
  44. सरकारी व खाजगी सुरक्षा सेवा.
  45. विद्युत आणि गॅस पुरवठा सेवा.
  46. एटीएम (ATM) सेवा 26. टपाल सेवा.
  47. बंदरे आणि संबंधित आस्थापना.
  48. कस्टम हाऊस एजंट्स/ लस (Vaccines) जीवनरक्षक औषधे, औषधे उत्पादने इ. च्या वाहतूकीशी संबंधित परवानाधारक मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स,
  49. अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल / पॅकेजिंग साहित्य तयार करणारे उद्योग.
  50. नागरिकांसाठी तसेच विविध संस्थांसाठी पावसाळी हंगामाचे साहित्य उत्पादनाशी संबंधित
  51. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे मान्यता दिलेल्या अत्यावश्यक सेवा

3. सूट दिलेल्या सेवा व आस्थापना:-

  1. केंद्र आणि राज्य सरकारी स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्यालये, ज्यामध्ये त्यांचे वैधनिक प्राधिकरण आणि संस्था यांचा समावेश होतो.
  2. सहकारी बँका, शासनाचे सार्वजनिक उपक्रमा अंतर्गत आणि खाजगी बँका.
  3. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांची कार्यालये.
  4. विमा व वैद्यकीय विमा कंपनी
  5. उत्पादन व वितरणच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेली औषध कंपन्यांची कार्यालये.
  6. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था जसे की, मध्यस्थ, प्राथमिक पुरवठादार, सीसीआयएल,
    पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स (RBI regulate entitites and intermediaries including standalone primary: dealers, CCIL, NPCL, Payment system operators and financial market participants : operating in RBI regulated markets.)
  7. सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे.
  8. सर्व सूक्ष्म पतपुरवठा संस्था.
  9. कार्यान्वित न्यायालये, न्यायाधिकरण किंवा आयोगामध्ये चौकशी सुरु असतील, तर संबंधित अधिवक्त्यांची (Advocate) कार्यालये
    त्याचप्रमाणे वरील परिच्छेद क्र.1 मध्ये नमूद मान्यताप्राप्त दुकाने / आस्थापना / उपक्रम / घटक / संस्था यांना ज्या निर्बंधांच्या अधिनतेने सुरु करण्यास मान्यता दिली आहे, त्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर त्यांच्याद्वारे कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या उपाययोजनांचे तसेच मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure) अनुपालन करण्यात येईल. निर्बंधांच्या अधिन राहून सुरु करण्यास मान्यता देण्यात बाबीव्यतिरिक्त ज्या बाबींना या कार्यालयाकडून यापूर्वी स्वतंत्र आदेशान्वये मान्यता देण्यात आलेली आहे, त्यादेखील विहित निर्बंधांच्या अधिनतेने सुरु राहतील. तसेच या आदेशात उल्लेख नसलेल्या प्रतिबंधीत बाबीकरीता यापूर्वी शासनाकडून व अनुषंगाने या कार्यालयाकडून विविध आदेशान्वये वेळोवेळी लागू केलेले प्रतिबंध लागू राहतील.
    या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच या आदेशाची अंमलबजावणी नागरिकांमार्फत काटेकोरपणे केली जाईल. यादृष्टीने आवश्यक नियोजन व उपाय योजना जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी कराव्यात, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व शासकीय यंत्रणांना निर्देश दिले आहेत.
    या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / आस्थापना शासनाने यापूर्वी लागू केल्यानुसार दंडात्मक कारवाईस तसेच भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270 271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतूदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.
    www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button