मुंबई – गोवा महामार्गावर आंजणारी येथे आला खडी, दगडमिश्रित चिखल
लांजा : सोमवारी सकाळपासून कोसळणाऱ्या पावसाने लांजा तालुक्यातील काही भागात पाणीच पाणी झाले. दुपारी सुमारे २ वाजता लांजा तालुक्यातील अंजणारी येथे मुंबई – गोवा महामार्गावर खडी, दगड मिश्रित चिखल मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने काहीकाळ दुचाकी वगळता इतर वाहतूक थांबवावी लागली. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला.