जिल्ह्यात 2 जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस

रत्नागिरी : 2 जुलैपर्यंत जिल्ह्यात अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. किनारपट्टीवर 60 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने 29 जून ते 1 जुलै या कालावधीमध्ये दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी 40-50 कि.मी. ते 60 कि. मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. मच्छिमारांनी सदर कालावधीत समुद्रात जावू नये असे आवाहन केले आहे तर 28 जून ते 2 जुलै या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button