नवउद्योजकांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग योजनांचा लाभ घ्यावा- विद्या कुलकर्णी

सीए इन्स्टिट्यूटतर्फे कार्यक्रम

रत्नागिरी
राज्य शासनाने नवउद्योजकांसाठी नवनवीन योजना लागू केल्या आहेत. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाकरिता विविध योजना असून त्याचा जास्तीत जास्त लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांनी घेतला पाहिजे. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आणि कर्ज घेताना तसेच जागा खरेदी, विज, यामध्ये भरघोस अनुदान, सवलत देण्यात येते. एससी, एसटी आणि महिलांसाठीही जास्त टक्के सवलत दिली जाते. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी केले.

जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिनानिमित्त सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे मथुरा एक्झिक्यूटीव्ह येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी सीए इन्स्टिट्यूटचे शाखाध्यक्ष प्रसाद आचरेकर यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की, प्रथमच जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उद्योजक होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती व लागणारे सर्व सहकार्य करू.

विद्या कुलकर्णी म्हणाल्या सीएंनीसुद्धा आपापल्या ग्राहकांना याची माहिती द्यावी. याच्या जिल्हा समितीमध्येही सीएंच्या दोन प्रतिनिधींनी सहभाग घ्यावा. तसेच कर्जासाठी बॅंकेला लागणारा प्रस्ताव बनवून द्यावा. उद्योजकांसाठीच्या या योजनांची लोकांमध्ये जागृती करावी लागेल. जास्तीत जास्त माहिती दिली पाहिजे. सूक्ष्म लघु, मध्यम उद्योग 2006 च्या कायद्यानुसार योजना आहे. तसेच २०२० मध्ये या योजनांमध्ये सुधारणा व काही बदल करण्यात आले. जागा खरेदीसाठी पैसे दिले जातात आणि खरेदीखताच्या नोंदणी खर्चात सवलत मिळते. प्रकल्प व यंत्रसामग्रीसाठी योजना आहे. वीजबिलासाठी 50 पैसे युनिटचे पैसे परत मिळतात. इलेक्ट्रॉनिक्स ड्युटी, सबसिडी, टर्म लोन दुसऱ्या वर्षी दिले जाते. राज्य सरकारचा जीएसटीमध्ये 25 टक्के पैसे दिले जातात. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पाणी साठवणूक याकरिता अनुदान दिले जाते.

इन्स्टिट्यूटच्या शाखेचे खजिनदार सीए केदार करंबेळकर यांनी सूत्रसंचालन केले. विकासा चेअरमन सीए सौ. अभिलाषा मुळ्ये यांनी कुलकर्णी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला. याप्रसंगी सदस्य सीए शैलेश हळबे यांच्यासह रत्नागिरीतील सीए उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button