
सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली
सिने अभिनेता सलमान खानच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना आज पहाटे समोर आली आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.दरम्यान सलमानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. तसेच सलमान सोबत मुख्यमंत्री शिंदे यांनी फोनवरून चर्चा देखील केली आहे. यावेळी मुख्यमंत्री यांच्याकडून सुरक्षे संदर्भात दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीने अभिनेता सलमान खान यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. आज पहाटे सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीने अभिनेता सलमान खान यांच्याशी फोनवरून चर्चा करून त्यांना सुरक्षे संदर्भात दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचीही सूचना केली असल्याची देखील माहिती मिळत आहे. सलमान खानच्या घरावरील गोळीबाराच्या घटनेवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिसांच्या तपासातून खरी माहिती समोर येईल. त्यामुळे पोलिसांच्या तपास होईपर्यंत यावर काही सांगता येणार, नसल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. www.konkantoday.com