
डोंगर गावातील मंदिरावर कोसळला वृक्ष; पाहणी करण्यासाठी माजी सरपंचांचे तहसीलदारांना निवेदन
राजापूर : तालुक्यातील डोंगर गावातील देवराई येथील श्री देव गांगोमंदिरावर वृक्ष कोसळून मंदिराचे नुकसान झाले आहे. तरी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी डोंगरचे माजी सरपंच दीपक शेलार यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन शेलार यांनी राजापूर तहसीलदारांना दिले आहे.
सोमवारी दि. २७ जून रोजी पहाटे झालेल्या वादळी वारा व पावसामुळे या ठिकाणी देवराई येथे असलेल्या गांगो मंदिरावर वृक्ष कोसळून पडला आहे. तरी या ठिकाणी पाहणी करून पंचनामा करावा. मंदिराच्या पुनर्बांधणीला ग्रामस्थांना परवानगी द्यावी, अशी मागणी शेलार यांनी राजापूर तहसीलदारांकडे केली आहे.