शिवसेनेचे मंत्री उदय सामंत गुवाहाटीला पोहचले,एकनाथ शिंदे यांची गळाभेट घेतली
शिवसेनेचे मंत्री उदय सामंत गुवाहाटीला पोहचले आहेत. सामंत सकाळपासून नॉट रीचेबल होते.उदय सामंत आज गुवाहाटीला गेले. हॉटेलमध्ये पोहचल्यावर त्यांनी एकनाथ शिंदेंची गळा भेट घेतली.विशेष म्हणजे काल शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उदय सामंत उपस्थित होते. आता ते देखील शिंदे गटात सामिल झालेविधानसभेत निवडून आलेले शिवसेनेचे केवळ आदित्य ठाकरे हे एकमेव मंत्री शिवसेनेबरोबर असतील.
कारण उद्धव ठाकरेंबरोबर असलेले सुभाष देसाई आणि अनिल परब हे विधान परिषदेचे सदस्य आहेत.उदय सामंत यांनी सुरतमार्गे गुवाहाटीला जाण्याआधी आमदार राजन साळवी यांना फोन केला होता.माझ्याबरोबर आपणही चला. पण राजन साळवी यांनी नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. अनिल परब, सुनील तटकरे नेहमीच नेत्यांच्या कामात हस्तक्षेप करायचे. त्यामुळे कोकणातील शिवसेना आमदारांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती, अशी चर्चा आहे.
उदय सामंत उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेत ते आपली भूमिका मांडणार आहेत.
www.konkantoday.com