रत्नागिरीचे आमदार व कोकणचे नेते मंत्री उदय सामंत शिंदे गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीच्या वाटेवर
रत्नागिरीचे आमदार व उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे आज शिंदे गटात सामील होण्यासाठी आसाम गुवाहाटीकडे गेले असल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध होत आहे दोन दिवसांपूर्वीच त्यांनी पाली येथील निवासस्थानी सामंत यांनी आपण शिवसेनेतच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते मात्र बंडखोर आमदारांची बाजूही ऐकून घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते त्यानंतर आज सामंत यांचा फोन नॉट रिचेबल लागत आहे त्यामुळे सामंत हे गुवाहाटीकडे गेल्याचे वृत्तवाहिन्यांचे वृत्त आहे त्यांच्या जवळच्या लोकांची ही संपर्क साधण्यात येत आहे मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे कळत आहे सामंत हे गुवाहाटीच्या वाटेवर असावेत यासाठी पुरावा म्हणून चार्टर विमानाचा चार जणांच्या यादीत उदय सामंत यांचे नाव पहिले असल्याचेही वृत्तवाहिन्यांवर दाखविले जात आहे एकीकडे बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेना उतरली आहे असे असल्याने सामंत हे शिंदे गटात सामील झाले तर शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे सामंत यांनी शिवसेनेमध्ये मोठी ताकद निर्माण केली आहे मातोश्रीचे व विशेषता आदित्य ठाकरे यांचेशी त्याचे जवळचे संबंध आहेत व ते विश्वासातले मानले जातात त्यामुळे सामंत हे शिंदे गटात सामील होतील असे कुणालाही वाटले नाही
सध्या शिवसेनेमध्ये मोठमोठे डावपेच आखले जात आहेत एकनाथ शिंदे यांना एकाकी पाडून शिंदे गटातील काही आमदारांना शिवसेनेकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत कदाचित त्याचाच भाग म्हणून सामंत यांच्यावर काही विशेष कामगिरी सोपवण्यात आली असल्याची शक्यता काही राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे त्यामुळे मंत्री उदय सामंत हे शिंदे गटात सामील होण्यासाठी गेले आहेत का आणि गेले असेल तरी त्यांचा उद्देश काय आहे हे सध्या तरी समजणे कठीण आहे मात्र मुंबईत आल्यानंतर बंडखोर आमदारांचा एक गट शिवसेनेच्या बाजूने उभे करण्यासाठी शिवसेनेकडून सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत याबाबत स्वतः सामंत यांनी प्रतिक्रिया दिल्यावरच सर्व काही स्पष्ट होऊ शकणार आहे
www.konkantoday.com