रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे ठरल्या 11 लाखांच्या पैठणीच्या मानकरी; 26 जून रोजी सायंकाळी 7 वा. कार्यक्रमाचे प्रसारण
रत्नागिरी : येथील लक्ष्मी मंदार ढेकणे यांनी झी मराठीवरील महामिनिस्टर या कार्यक्रमात 11 लाखांची पैठणी पटकावली. त्यांनी मिळवलेल्या या यशामुळे रत्नागिरीकरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. महामिनिस्टर कार्यक्रमात रत्नागिरी केंद्रावर झालेल्या स्पर्धेत त्या सव्वालाखाची पैठणी व सोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या होत्या. त्यानंतर त्यांची निवड महामिनिस्टरच्या अंतिम फेरीत झाली होती. राज्यभरातून दहाकेंद्रावरुन दहाजणींची निवड करण्यात आली. महामिनिस्टरची अंतिम फेरी मुंबईत झाली. यात लक्ष्मी ढेकणे यांनी दहाजणींमधून सरस कामगिरी करीत पैठणीवर नाव कोरले. दि. 26 जून रोजी सायंकाळी 7 वा. महामिनिस्टरचा 11 लाखांच्या पैठणीचा अंतिम भाग प्रसारित होणार आहे.