
चिपळुणात निर्धार : आम्ही शिवसेनेशी प्रामाणिक, उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठाम
चिपळूण : आम्ही शिवसेनेशी प्रामाणिक असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम आहोत. एकही शिवसैनिक हलणार नाही, अशा शब्दात चिपळूणमधील शिवसेना पदाधिकार्यांनी बैठकीत ठाम निर्धार व्यक्त केला. शिवसेनेत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी चिपळूणमधील शिवसेना पदाधिकार्यांची बैठक आयोजित केली होती. बहादूरशेख येथील पुष्कर सभागृहात जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी आ. सदानंद चव्हाण, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, उपजिल्हा प्रमुख शशिकांत चाळके, शहरप्रमुख उमेश सकपाळ, युवासेना तालुकाप्रमुख उमेश खाताते उपस्थित होते तर तालुकाभरातील सुमारे 200 शिवसेना पदाधिकारी उपस्थित
होते.शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी बाबत शिवसैनिकांनी संतप्तपणे आपल्या भावना यावेळी मांडल्या.