अंत्यसंस्कारासाठी जाणारी मिनीबस उधळे येथे उलटून 20 जण जखमी
खेड : पुणे येथून खेड नादिवली येथे अंत्यसंस्कारासाठी जात असलेली मिनीबस शुक्रवारी दि. 24 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास उलटली. मुंबई-गोवा महामार्गावरील उधळे गावानजीक टायर फुटल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात बसमधून प्रवास करणारे 20 जण जखमी झाले असून यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये कला दगडू गोरे (वय 37, नांदिवली), लक्ष्मी संतोष गोरे (वय 48, अस्तान), आशा अशोक आखाडे (वय 45, नांदिवली), शुभांगी सुभाष वरक (वय 46, कावळे), कल्पना तुकाराम आखाडे (वय 45, अस्तान), अर्चना अनंत आखाडे (वय 36, नांदिवली), अनंत रामचंद्र आखाडे (वय 40, नांदिवली), सुनील विठ्ठल ठेबे (वय 25, किंजळे), चंद्रकांत रामचंद्र आखाडे (वय 33, नांदिवली), आनंद विठ्ठल ढेबे (वय 25, किंजळे), सागर आनंदा खाडे (वय 17, नांदिवली), अस्मिता अनंत आखाडे (वय 18, नांदिवली), आरती चंद्रकांत आखाडे (वय 9, नांदिवली), अशोक रामचंद्र आखाडे (वय 52 नांदिवली), मंगेश संतोष गोरे (वय 28, आस्तान), उषा चंद्रकांत आखाडे (वय 27, नांदिवली), सुरेखा तुकाराम आखाडे (वय 48, नांदिवली) यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच 20 रुग्णांना 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.