
गुडविन ज्वेलर्सच्या फरार मालकांना अटक
गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनील कुमार मोहनन अकराकरण आणि सुधीरकुमार मोहनन अकराकरण या दोघांनाही ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलीये. हे दोघे भाऊ मागील दीड महिन्यापासून फरार होते. 1 हजार 154 गुंतवणुकदारांची अंदाजे 25 कोटी रुपयांची फसवणूक या दोघा भावांनी केली होती असा आरोप त्यांच्यावर होता. यानुसार ठाणे पोलिस आयुक्तालयातील डोंबिवली, नौपाडा आणि शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये या दोघांच्या विरोधात गुंतवणूकदारकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते.
www.konkantoday.com